पुणे: जन्मदात्या वडिलांनी मुलीवर बलात्कार, आईने आपल्या पतीची बाजू घेतली

पुणे | राहत्या घरात जन्मदात्या वडिलांनी मुलीवर बलात्कार केल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे. ही धक्कादायक बाब उघड होताच पोलिसांनी आरोपीला अटक केली. मात्र पिडीत मुलीच्या आईने आपल्या पतीची बाजू घेतली. धानोरीतील मुंजाबा वस्तीत राहणाऱ्या मुलीवर स्वत:च्या वडिलांकडून गेले सहा वर्ष बलात्कार होत होता. पिडीत मुलगी आता सोळा वर्षाची आहे. म्हणजेच मुलगी दहा वर्षाची असल्यापासून आरोपी तिच्यावर बलात्कार करत होता. आरोपीवर बालकांचे लैंगिक अत्याचारापासून संरक्षण कायद्याअंतर्गत तसेच बलात्काराचा गुन्हा विश्रांतवाडी पोलिस स्टेशनमध्ये दाखल करण्यात आला आहे.
आरोपीने पुन्हा 2 सप्टेंबर रोजी पुन्हा पडित मुलीवर बलात्कार केला. वारंवार बलात्कार होत असल्यामुळे तिला वेदना जाणवू लागल्या आणि तिने तातडिने घराशेजारील महिलांना हा सगळा प्रकार सांगितला. त्या महिलांनी तिला पोलिस स्टेशनला नेलं आणि घडलेला प्रकार पोलिसांना सांगायला लावला.
दरम्यान, आरोपी 45 वर्षीय असून बीगाऱ्याचे काम करतो. तसेच हा सगळा प्रकार कोणाला सांगितल्यास जीवे मारण्याची धमकीही पिडीत मुलीला देत असल्याचं पोलिस निरिक्षक रविंद्र कदम यांनी सांगितलं आहे.