जम्बो रुग्णालयात महापालिकेने तैनात केले मनुष्यबळ, रेमिडिसीविर सह सर्व उपचार मोफत

जम्बो रुग्णालयात महापालिकेने तैनात केले मनुष्यबळ, रेमिडिसीविर सह सर्व उपचार मोफत

पुणे – COEP मैदानावरील जम्बो कोविड रुग्णालयातील रुग्ण व्यवस्थापन करण्यासाठी महापालिकेने मनुष्यबळ उपलब्ध करून दिले आहे. तेथे पुरेसे मनुष्यबळ तैनात केले आहे.

अतिरिक्त महानगरपालिका आयुक्त आणि जम्बो कोविड रूग्णालयाच्या कार्यकारी अध्यक्ष रुबल अग्रवाल यांनी सांगितले की, “जम्बो कोविड रुग्णालयात 50 डॉक्टर आणि 120 पॅरामेडिकल कर्मचारी असे मनुष्यबळ काम करेल.”

जम्बो सेंटरमधील डॉक्टर आणि परिचारिकांनी राजीनामा दिल्याची माहिती पसरत आहे. मात्र आधीची एजन्सी काढण्यात आली आहे. आणि महापालिकेच्या वतीने त्वरीत नेमण्यात आलेले सर्व डॉक्टर, कर्मचारी सेवेत रुजू आहेत, असे अग्रवाल यांनी स्पष्ट केले.

आज वरिष्ठ अधिकाऱ्यांनी जम्बो कोविड रुग्णालयातील परिस्थितीचा आढावा घेतला. तेथे दोन कार्डियाक रुग्णवाहिका उपलब्ध करून देण्यात आल्या आहेत.
तसेच, जम्बो सेंटरमध्ये सर्व उपचार विनामूल्य केले जातील. रेमिडिसीविर इंजेक्शन्स देखील विनामूल्य दिली जातील, असे रुबल अग्रवाल यांनी सांगितले.

“रुग्णांच्या नातेवाईकांना रेमिडिसीविरसाठी प्रिस्क्रिप्शन देण्याचे धोरण आहे, परंतु सध्या दाखल झालेल्या रूग्णांसाठी आम्ही सध्याच्या परिस्थितीवर नियंत्रण ठेवण्यासाठी रेमडिसीविर देण्याचा निर्णय घेतला आहे.
करोना रुग्णाच्या नातेवाईकांना बाहेरून इंजेक्शन खरेदी करण्यास सांगितले तर कर्मचार्‍यांवर कारवाई केली जाईल. कोणत्याही तक्रारीसाठी रुग्णाचे कुटुंबीय महापालिकेच्या आपत्ती व्यवस्थापन कक्षाशी संपर्क साधू शकतात.

Latest News