मी कोणत्याही दबावाला घाबरत नाही – पोलिस आयुक्त कृष्ण प्रकाश

पिंपरी |  पिंपरी-चिंचवड शहराकडे राज्याकडे औद्योगिक आणि आयटी हब म्हणून पाहिले जाते. त्यामुळे यात वेगवेगळ्या प्रकारचे लोक असू शकतात. माथाडींच्या नावाखाली चालणारी गुंडगिरी मोडून काढली जाणार आहे. मी कोणत्याही दबावाला जुमानत नाही, असं पिंपरी-चिंचवड शहराचे नविन पोलिस आयुक्त कृष्ण प्रकाश यांनी सांगितले.

5 सप्टेंबर शनिवारी कृष्ण प्रकाश यांनी आपला पदभार स्वीकारला. त्यावेळी ते प्रसारमाध्यमांसोबत बोलत होते.  शहरात 99 टक्के लोक कायदा पाळतात तर 1 टक्का लोक कायद्याचे पालन करत नाहीत. या एक टक्का लोकांमुळे गुन्ह्याला चालना मिळवून ते घडले जातात. या प्रकारच्या लोकांनी हे लक्षात ठेवावे की, कायदा सर्वांसाठी सारखा असून, मी कोणत्याही दबावाला जुमानत नाही, असं कृष्ण प्रकाश म्हणाले.

पिंपरी-चिंचवड शहराचा अभ्यास करुन, कायद्याचे पालन न करण्याऱ्या, तसेच गुन्हा करणाऱ्या लोकांसाठी स्ट्रॅटेजी आखली जाणार आहे. लोकांनी बेकायदेशीर उद्योग करु नयेत. या बाबींना माझ्यालेखी थारा नाही. कायद्यात राहून काम करणाऱ्या प्रत्येक माणूस आणि पोलिसांच्या मी सदैव पाठीशी उभा राहणार आहे, असंही कृष्ण प्रकाश यांनी सांगितल.

दरम्यान, पिंपरी- चिंचवड शहराचे पूर्वीचे पोलिस आयुक्त संदिप बिष्णोई यांची शासनाने मुदतपूर्व बदली केली आहे. त्यामुळे बदली विरोधात ते न्यायाधिकरणमधे दाद मागणार असल्याचं बोललं जात आहे.