घाबरु नका, कोरोना संपल्यावर आपलीच सत्ता येईल- रावसाहेब दानवे


औरंगाबाद | अब्दुल सत्तार शिवसेनेत राहतील याची गॅरेंटी कुठे आहे?. पहिले अपक्ष, मग काँग्रेस आणि आता शिवसेनेत, असा टोला भाजप नेते रावसाहेब दानवे यांनी शिवसेना नेते आणि मंत्री अब्दुल सत्तार यांना लगावला आहे. घाबरु नका, कोरोना संपल्यावर आपलीच सत्ता येईल. आणि सत्तार मला भेटायला भोकरदनला येतील आणि बोलतील फडणवीसांना भेटायला जाऊया, असा चिमटा रावसाहेब दानवे यांनी अब्दुल सत्तारांना काढलाय.
राजकारणात कोणी कोणाचा शत्रू नाही आणि मित्र नाही. अब्दुल सत्तारसारखा नेता महाराष्ट्रात नाही, सगळ्यांना मदत करतो आणि निवडून आल्यावर नावं ठेवतो. यावेळेला मी तुम्हाला मदत केली नाही कारण मला याआधीच माहिती होतं शिवसेना काय करणार आहे, असंही दानवे म्हणाले.
दरम्यान, परिस्थिती कठीण आहे, एकमेकांसमोर तोंड बांधून उभं राहू असं कधी वाटलं नाही, पण काही लोकांच्यावर याचाही परिणाम होत नाही. ही जागतिक महामारी आहे, असंही दानवे म्हणाले.