अभिनेता अर्जुन कपूर पाठोपाठ अभिनेत्री मलायका अरोरा हिला कोरोनाची लागण झाली


मुंबई : अभिनेता अर्जुन कपूर पाठोपाठ अभिनेत्री मलायका अरोरा हिला कोरोनाची लागण झाली आहे. सध्या तिच्यावर उपचार सुरु आहेत. मलायका अरोरा हिची बहिण अमृता अरोरा हिने मलायकाला कोरोना झाल्याची माहिती दिल्याचं सांगितलं जात आहे. विशेष म्हणजे इंडिया बेस्ट डान्सर या रिअॅलिटी शोच्या सेटवरील 7 ते 8 जणांना कोरोनाची लागण झाली होती. मलायका या रिअॅलिटी शोची परीक्षक आहे. ‘मला नुकतंच कोरोनाची लागण झाली आहे. माझ्यात कोरोनाची कोणतीही लक्षण नाहीत. मी स्वत:ला होम क्वारंटाईन करुन घेतलं आहे,’ अशी माहिती मलायकाने दिली. ‘मी लवकरच यातून बरी होईन,’ असेही ती म्हणाली.
दरम्यान नुकतंच अर्जुन कपूरचा रिपोर्ट पॉझिटिव्ह आला आहे. त्यानंतर मलायकालाही कोरोनाची बाधा झाल्याचं बोललं जात आहे. गेल्या अनेक महिन्यांपासून या दोघांचे अफेअर असल्याच्या चर्चा सुरु आहे. मात्र त्या दोघांनी याबाबत अधिकृत घोषणा केलेली नाही.
दरम्यान नुकतंच बॉलिवूड अभिनेता अर्जुन कपूरला कोरोनाची लागण झाल्याची माहिती दिली आहे. त्याने सोशल मीडिया अकाऊंटवर पोस्ट करत याबाबतची माहिती दिली. अर्जुनने रविवारी इंस्टाग्रामवर पोस्ट केली. सध्या अर्जुनने डॉक्टरांच्या सल्ल्याने स्वत:ला घरी क्वारंटाईन केलं आहे.
‘तुम्हा सर्वांना सूचित करणं माझं कर्तव्य आहे की माझा कोरोना व्हायरस अहवाल पॉझिटिव्ह आला आहे. मी ठिक आहे. माझ्यात कुठलीही लक्षणं नाहीत. मी डॉक्टर्स आणि अधिकाऱ्यांच्या सल्ल्यानुसार घरी स्वत:ला आयसोलेट केलं आहे. मी होम क्वारंटाईन आहे.’ अशी पोस्ट अर्जुन कपूरने केली आहे अभिनेता अरबाज खान याच्याशी घटस्फोट घेतल्यानंतर, काहीच दिवसांत मलायकाचं नाव अर्जुनशी जोडण्यात आलं. हे दोघे अनेकदा सोबत वेळ घालवताना, पार्टीला सोबत जाताना दिसून येत होते. मात्र, या दोघांनीही कधीही ऑफिशिअली आपल्या नात्याला स्वीकारलं नाही.