आर. आर. आबा यांचे सुपुत्र रोहित पाटील यांच्यापाठोपाठ राष्ट्रवादीच्या आमदार सुमन पाटील यांनाही कोरोनाची लागण


सांगली | आर. आर. आबा यांचे सुपुत्र रोहित पाटील यांच्यापाठोपाठ राष्ट्रवादीच्या आमदार सुमन पाटील यांनाही कोरोनाची लागण झाल्याचं समोर आलंय. सुमन पाटील या राष्ट्रवादीकडून तासगाव – कवठेमहांकाळ विधानसभा मतदारसंघातील आमदार आहेत. याआधी त्यांचे पुत्र रोहित पाटील आणि दीर सुरेश पाटील या दोघांचे कोरोना अहवाल पॉझिटिव्ह आले होते.
आमदार सुमन पाटील यांच्यासह तिघांचीही प्रकृती ठीक असल्याची माहिती कुटुंबीयांनी दिली. तिघांनाही उपचारासाठी पुण्याला नेण्यात आलं आहे. दरम्यान, सांगली जिल्ह्यात कोरोनाचा संसर्ग वाढताना दिसत आहे. सांगली जिल्ह्यात काल दिवसभरात कोरोनामुळे तब्बल 36 जणांचा मृत्यू झाला आहे.