न्यायपालिकेआधीच कुणाला दोषी सिद्ध करणं चुकीचं – तापसी पन्नू


मुंबई | सध्या अनेक मुद्द्यांवरून ट्विटर वॉर सुरु असल्याचं दिसतंय. त्यातच आता अभिनेत्री तापसी पन्नूने एक ट्विट केलं आहे. या ट्विटमुळे तापसी पन्नू चांगलीच चर्चेत आली आहे.
तापसीने केलेलं हे ट्विट सुशांत सिंग राजपूतची गर्लफ्रेंड रिया चक्रवर्तीच्या सपोर्टमध्ये केल्यांचं म्हटलं जातंय. तापसीने तिच्या या ट्विटमध्ये लिहिले आहे की, ‘किसी को इतना भी मत डराओ कि डर ही खत्म हो जाए… और जिसको डर नहीं होता न उससे थोड़ा डरना चाहिए.’ यापूर्वी ही तापसीने एक ट्विट केलं होतं. या ट्विटमध्ये तापसी म्हणाली होती की, ‘मी पर्सनली ना सुशांतला ओळखत होते ना रियाला, पण हे नक्की माहीत आहे की, न्यायपालिकेआधीच कुणाला दोषी सिद्ध करणं चुकीचं आहे. कायद्यावर विश्वास ठेवा’. दरम्यान सुशांत आत्महत्याप्रकरणाचा तपास आता सीबीआयद्वारे करण्यात येतोय. यामध्ये आता ड्रग्ज प्रकरणावरून पुन्हा रियाची चौकशी करण्यात येणार आहे. तर रविवारी केलेल्या चौकशीदरम्यान सुशांत ड्रग्ज घेत असल्याचं रियाने मान्य केलंय.