मुंबईचा अपमान करणाऱ्या कंगणाला केंद्राने वाय दर्जाची सुरक्षा देणं धक्कादायक

मुंबई | सध्या बॉलिवूड अभिनेत्री कंगणा राणावत चांगलीच चर्चेत आहे. कंगणाने मुंबई आणि मुंबई पोलिसांबाबत केलेल्या वक्तव्यावरून तिला राज्यातील नेत्यांनी आणि मराठी कलाकारांनी चांगलंच धारेवर धरलं होतं. शिवसेना आणि कंगणामध्ये शाब्दिक युद्ध रंगलं असून कंगणाचा सर्वांनी निषेध व्यक्त केला असताना कंगणाला केंद्र सरकारने वाय दर्जाची सुरक्षा दिली आहे. यावर राज्याचे गृहमंत्री अनिल देशमुख यांनी नाराजी व्यक्त केली आहे. मुंबईचा अपमान करणाऱ्या कंगणाला केंद्राने वाय दर्जाची सुरक्षा देणं धक्कादायक असल्याचं अनिल देशमुख यांनी म्हटलं आहे. महाराष्ट्र हा फक्त शिवसेना, राष्ट्रवादी आणि काँग्रेस या तीन पक्षांचा नाही. तर भाजप आणि अवघ्या जनतेचा आहे. त्यामुळे मुंबई आणि महाराष्ट्राचा अपमान करणाऱ्यांचा सर्व पक्षांनी निषेध नोंदवायला हवा, असं म्हणत देशमुख यांनी महाराष्ट्र भाजपवर निशाणा साधला.

दरम्यान, दोन दिवसांनी मी मुंबईला येत आहे, कोणात हिम्मत आहे त्याने मला अडवा, असं कंगणाने म्हटलं आहे. त्यानंतर मी एक शिवसैनिक असून पोकळ धमक्या देत नाही, असं संजय राऊत यांनी म्हटलं होतं.

Latest News