पीडित मुलगी सेलब्रिटी नव्हती म्हणून तिला न्याय नाकारणं हे रामराज्याच्या गप्पा मारणाऱ्यांना शोभत नाही: राऊत

मुंबई | मुंबईत एत नटवीच्या बेकायदेशीर बांधकामावर कारवाई केल्यावर तिच्या बाजूने उभे राहिलेल्यांनी हाथरसला जाऊन पीडित मुलीच्या बाजुने न्यायाची लढाई लढावी, असं शिवसेना खासदार संजय राऊत यांनी म्हटलं आहे. पीडित मुलगी सेलब्रिटी नव्हती म्हणून तिला न्याय नाकारणं हे रामराज्याच्या गप्पा मारणाऱ्यांना शोभत नाही, असंही राऊत यांनी म्हटलं आहे.
दरम्यान, एकंदरित मागील काही दिवसांमागे अभिनेत्री कंगणा राणावतला मुंबईची तुलना पाकिस्तानने केल्यावर शिवसेना आणि कंगणात संघर्ष पेटला होता. त्यावेळी भाजपने कंगणाला आपला पाठिंबा दर्शवला होता.