पुण्यातील माजी नगरसेवक विजय मारटकर यांच्या मुलाचा खून


पुणे | पुण्यातील शिवसेनेचे दिवंगत माजी नगरसेवक विजय मारटकर यांच्या मुलाचा खून झाल्याची घटना घडली आहे. या घटनेमुळे एकच खळबळ उडाली आहे. दिपक मारटकर असं खून झालेल्या तरुणाचं नाव आहे. 12 वाजण्याच्या सुमारास दिपक आणि त्याचे काही सहकारी कार्यालयाबाहेर थांबले होते. त्यावेळी पाच ते सहा जणांनी दिपकवर धारदार शस्त्राने सपासप वार केले. काही कळण्याच्या आतच दीपक रक्ताच्या थारोळ्यात पडला होता. हल्लेखोरांनी घटनास्थळावरुन पळ काढला.
हा हल्ला का करण्यात आला यामागील नेमके काय कारण आहे हे अद्याप समजू शकलेलं नाही. हल्लेखोराचा शोध परिसरातील सीसीटीव्हीच्या माध्यमातून घेतला जात आहे, अशी माहिती फरासखाना पोलिसांनी दिली.