अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांना कोरोनाची लागण


मुंबई | अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांना कोरोनाची लागण झाली आहे. डोनाल्ड ट्रम्प यांनी ट्विट करत या संदर्भात माहिती दिली आहे. डोनाल्ड ट्रम्प यांनी नजीकचा सहकारी करोना पॉझिटिव्ह आढळल्यानंतर कोरोना चाचणी करण्यात आली असल्याची माहिती दिली होती.
मी आणि माझी पत्नी मेलेनिया कोविड पॉझिटिव्ह आढळले आहोत. आम्ही लवकरच क्वारंटाइन प्रक्रियेला सुरुवात करत आहोत. आम्ही एकत्र यामधून बाहेर पडू, असं डोनाल्ड ट्रम्प म्हणालेत.