हाथरस बलात्कार प्रकरण: ‘ही घटना अत्यंत दुर्दैवी आहे. या प्रकरणाचा जेवढा निषेध करावा, तेवढा थोडा आहे’

Amol-Kolhe-141

जुन्नर : उत्तर प्रदेशातील हाथरस बलात्कार प्रकरणाचे देशभरात पडसाद उमटत आहे. या प्रकरणावरून योगी सरकारवर विरोधकांनी टीकेची झोड उठवली आहे. राष्ट्रवादीचे खासदार अमोल कोल्हे यांनीही या प्रकरणावरून योगी आदित्यनाथ यांना सणसणीत टोला लगावला आहे.

राष्ट्रवादी काँग्रेसचे शिरूर लोकसभा मतदार संघाचे खासदारअमोल कोल्हे यांनी हाथरस बलात्कार प्रकरणावर दु:ख व्यक्त केले आहे. ‘ ही घटना अत्यंत दुर्दैवी आहे. या प्रकरणाचा जेवढा निषेध करावा, तेवढा थोडा आहे’ असं म्हणत निषेध केला आहे उत्तर प्रदेशमध्ये कुणाचे सरकार आहे हे सर्वांना माहिती आहे. त्यामुळे योगी सरकारने कुणाच्या आड लपून राजकारण करणे थांबवून आणि ज्या ठिकाणी आपले सरकार आहे, तिथेली माता भगिनींना सुरक्षित वातावरण दिले तर ते अधिक गरजेचं राहिल, असा सल्लावजा टोला अमोल कोल्हे यांनी योगी सरकारला लगावला आहे.

केंद्राने कायदा करण्याची गरज – अजित पवार

दरम्यान, राष्ट्रवादीचे नेते अजित पवार यांनी हाथरस प्रकरणावर निषेध केला आहे. ‘हाथरसमध्ये घडलेली घटना दुर्दैवी आहे. कुठल्याही पक्षाचे सरकार असेल अशा घटना घडल्या नाही पाहिजेत. केंद्र सरकारने त्यासाठी कायदा करण्याची गरज आहे जेणेकरुन असा प्रकार करणारे दहा वेळा विचार करतील’, असं अजितदादा म्हणाले.

त्याचबरोबर राहुल गांधी यांना झालेल्या धक्काबुक्की प्रकरणावरही अजित पवारांनी नाराजी व्यक्त केली आहे. ‘राजकीय आणि सामाजिक क्षेत्रातील लोकांना पीडितेच्या कुटुंबाला भेटू दिलं पाहिजे. कारण संसद असेल किंवा विधानसभा, तो विषय मांडण्यासाठी वस्तुस्थिती समजून घेण्याची गरज असते. राहुल गांधी तिथं जाण्याने कायदा आणि सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण झाला असता असं नाही, अशी प्रतिक्रिया अजितदादांनी दिली.

युपीत जंगल राज आहे का ? – अनिल देशमुख

तर, ‘ज्या पद्धतीने उत्तर प्रदेशमध्ये महिला अत्याचाराच्या घटना घडल्या आहेत. त्या काळिमा फासणाऱ्या गोष्टी आहेत. योगी आदित्यनाथांनी याकडे लक्ष दिले पाहिजे. उलट तिथल्या गोष्टींवर पडदा टाकण्याचा प्रयत्न होत आहे. युपीत जंगल राज आहे का असा प्रश्न निर्माण होतोय, अशी टीका राष्ट्रवादीचे नेते आणि गृहमंत्री अनिल देशमुख यांनी केली.

सुशांत सिंह राजपूत प्रकरणात सीबीआय चौकशीत नेमकं झालंय काय? मुंबई पोलीस चांगला तपास करत असताना अचानक सीबीआयकडे चौकशी सोपवण्यात आली. याचा निष्कर्ष काय आहे शेवटी ? सुशांत प्रकरणात त्यांच्या मृत्यूचा प्रश्न बाजूला राहिलाय आणि आता ड्रग्जवरचा मुद्दा पुढे आला आहे, असंही देशमुख म्हणाले.

Latest News