युपी पोलीसांनी माझे ब्लाउज ओढले, तृणमूल काँग्रेसच्या नेत्या ममता ठाकुर


हाथरस । उत्तर प्रदेशातील हाथरस येथे पीडितेवर झालेल्या बलात्कार आणि मृत्यू प्रकरणावरून, संपुर्ण देशात योगी सरकारचा निषेध केला जात आहे. याप्रकरणी पोलीसांनी चार आरोपींना ताब्यात घेतले असून, देशभरातून त्या नराधमांना शिक्षा झाली पाहिजे. आणि पीडितेला न्याय मिळाला पाहिजे अशी मागणी देशभरातून होत आहे. सध्या हाथरसमध्ये कलम 144 लागू करण्यात आली असून, हाथरसमध्ये माध्यमांना येण्यास बंदी घातली आहे. तसेच राजकीय नेत्यांनासुद्धा येण्यास हाथरसमध्ये बंदी घालण्यात आली आहे.

गुरुवारी खासदार राहुल गांधी आणि प्रियंका गांधी पीडितेच्या कुटुंबीयांना भेटण्यासाठी निघाले असता, त्यांना पोलीसांकडून धक्काबुक्की करण्यात आली होती. आणि आज टीएमसी खासदार डेरेक ओ ब्रायन तसेच ममता ठाकुर यांना सुद्धा पोलीसांनी पीडितेच्या कुटुंबीयांना भेटू दिले नाही. त्यावेळी पोलीसोबत मोठ्या प्रमाणात बाचाबाची सुद्धा झाली. त्यानंतर पोलीसांनी डेरेक ओ ब्रायन यांना धक्काबुक्की करून बाहेर पाडले. तृणमूल काँग्रेसच्या नेता ममता ठाकुर यांनी सांगितले की, ‘उत्तर प्रदेश महिला पोलिसांनी आमच्यासोबत धक्काबुक्की केली. त्यावेळी त्यांनी आमचे ब्लाउज ओढले, आमच्या खासदारांवर लाठीचार्ज केला आणि जमिनीवर पाडले. पुरूष पोलिसांनी सुद्धा आमच्यासोबत चुकीचा व्यवहार केला.’ अशा ठाकुर म्हणाल्या आहे