ऑगस्ट 2013 मध्ये माझे क्लायंट सिनेमाच्या शूटींगसाठी श्रीलंकेत होता


मुंबई | अभिनेत्री पायल घोषने दिग्दर्शक व अभिनेता अनुराग कश्यप याच्यावर लैंगिक गैरवर्तनाचे आरोप केलेत. या प्रकरणी काल मुंबई पोलिसांनी अनुरागची तब्बल 8 तास चौकशी केली. अनुरागच्या वकील प्रियंका खिमानी यांनी या प्रकरणासंदर्भात एक स्टेटमेंट जारी केले आहे. पायल घोषने अनुरागवर केलेले सर्व आरोप या स्टेटमेंटमध्ये फेटाळून लावण्यात आले आहेत.
पोलिसांनी अनुरागला चौकशीसाठी बोलवले होते. त्यावेळी त्याची वकील प्रियंका खिमानीने अधिकृत स्टेटमेंट जारी केले आहे. त्यात त्यांनी पायल घोष यांनी दाखल केलेल्या एफआयआर नूसार माझ्या क्लायंटने 2013 मध्ये त्यांना घरी बोलावून त्यांचा लैंगिक छळ केला. परंतू संपूर्ण ऑगस्ट 2013 मध्ये माझे क्लायंट सिनेमाच्या शूटींगसाठी श्रीलंकेत असल्याच प्रियंका यांनी म्हटलं आहे.