महाराष्ट्र बंदला माझा पाठींबा नाही


मुंबई | माझा महाराष्ट्र बंदला पाठींबा नाही, बंद करून काही फायदा होईल का?, कोरोनाचा संसर्ग आहे त्यामुळे बंद नकोच, असं खासदार संभाजीराजेंनी म्हटलं आहे. टीव्ही 9 शी ते बोलत होते. बंद पुकारणारे मराठा समाजातील नेते नाहीत. त्यांच्या बंदला मराठा समाजातून पाठिंबा नाही, असं मत संभाजीराजे छत्रपती यांनी व्यक्त केलं आहे. दरम्यान,छत्रपतींच्या घराण्यातील वारस म्हणून मराठा आरक्षणासाठी मी शेवटपर्यंत लढणार आहे. तरुणांनी आत्महत्या करु नये. वर्षभर कळ सोसा आत्महत्या हा पर्याय नसल्याचं म्हणत संभाजीराजेंनी मराठा तरूणांना टोकचं पाऊल न उचलण्याचा सल्ला दिला आहे.