हाथरस: पीडित कुटुंब पोलिसांच्या कैदेत मारहाण/फोन जप्त


नवी दिल्ली | उत्तर प्रदेशमधील बलात्कार पीडितेच्या कुटुंबियांना युपी पोलिसांची दहशत आहे. पोलिसांनी मुलीच्या घराला वेढा घातला आहे. कोणालाही सोडण्याची परवानगी नाही. पीडितेचा एक भाऊ पोलिसांची नजर चुकवत शेतातील वाटेने कसातरी मीडिया पर्यंत पोहोचला आणि सर्व काही हकीकत सांगितली. पीडितेच्या भावाने सांगितले की फोन घेण्यात आला असून आम्हाला कोणालाही सोडू देत नाही. आमच्या कुटुंबियांना धमकावलं जात आहे. घरातील लोकांनी मला सांगितलं की तु मीडियाला बोलायला हवं. मी येथे गुप्तपणे आलो आहे. आमचे ताऊही येत होते. काल डीएमने त्याला छातीवर लाथ मारली, असल्याचं पीडितेच्या भावाने सांगितलं.