योगी सरकार मुळे भाजपची प्रतिमा मलीन झाली- उमा भारती


नवी दिल्ली | उत्तरप्रदेशमधील हाथरस जिल्ह्यात एका 19 वर्षाची दलित मुलगी सामूहिक बलात्कराची शिकार झाली. त्यानंतर युपी पोलिसांनी कोणालाही पीडित कुटुंबाला भेटू दिलं नाही ना प्रसार माध्यमांना कुटुंबीयांशी संवाद साधू देत आहेत. याच पार्श्वभूीवर भाजपच्या फायरब्रँड नेत्या उमा भारती यांनी भाजपवर निशाणा साधला आहे. हाथरसमध्ये घडलेली घटना त्यानंतर पोलिसांच्या कारवाईबाबत समोर आलेलं प्रश्नचिन्ह या सगळ्यामुळे योगी सरकार आणि भाजपची प्रतिमा मलीन झाली आहे, असं उमा भारती यांनी म्हटलं आहे. दरम्यान, प्रसारमाध्यमांना पीडितेच्या कुटुंबीयांना भेटण्यापासून अडवू नये, असं आवाहनही उमा भारतींनी योगी सरकारला केलं आहे.