पुणे ग्रामीण पोलीस दलातील 20 हजार रुपयांची लाच घेताना 2 पोलीस कर्मचाऱ्यांना रंगेहात पकडले

police-lach

पुणे । पुणे ग्रामीण पोलीस दलातील आंबेगाव तालुक्यातील मंचर पोलीस ठाण्यात कार्यरत असणाऱ्या दोन पोलीस कर्मचाऱ्यांना लाचलुचपत प्रतिबंधक पथकाने 20 हजार रुपयांची लाच घेताना रंगेहात पकडले आहे. त्यांच्यावर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. अशी माहिती सापळा पथक प्रमुख पोलीस निरीक्षक सुनिल बिले यांनी दिली. क्रिकेट बेटिंग चालवतो म्हणून लाच मागून ती घेतल्या प्रकरणी प्रशांत सुरेश भुजबळ (वय 30) आणि कृष्णदेव सुभाष पाबळे (वय 32) या दोघांना ताब्यात घेण्यात आलेल्या पोलिस कर्मचाऱ्यांची नावे आहेत. या दोघांवर मंचर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

मिळालेल्या माहितीनुसार पाबळे आणि भुजबळ मंचर पोलीस ठाण्यात नेमणुकीस आहेत. यातील तक्रारदाराला क्रिकेट बेटिंग चालवितो म्हणून 30 सप्टेंबरला पकडण्यात आले होते. त्यावेळी त्यांच्याकडून 50 हजार रुपये घेतले होते. त्यानंतर देखील बेटिंग सुरू ठेवण्यासाठी त्यांच्याकडे दोघांनी 1 ऑक्टोबरला 50 हजार रुपयांची लाच मागितली होती. तक्रारदाराने याबाबत एसीबीकडे तक्रार केली होती. त्याची पडताळणी केली आणि अखेर 2 सप्टेंबरला 20 हजार रुपयांची लाच घेताना रंगेहात पकडण्यात आले आहे. दरम्यान यामुळे पोलिस दलात खळबळ माजली आहे.

दरम्यान महिन्याभरापूर्वी जवळच्याच नारायणगाव पोलिसात सुद्धा एक सहायक पोलिस निरीक्षक व एक पोलीस हवालदार अशाच पद्धतीने लाच लुचपत प्रतिबंधक पथकाने पकडले होते. ही चर्चा मागे पडत नाही तोच मंचरचे दोन पोलीस एसीबीच्या जाळ्यात अडकल्याने, पुणे ग्रामीण पोलिसांची प्रतिमा अजूनच डागाळली गेली आहे.

Latest News