हाथरस: पोलीस अधीक्षक, उप अधीक्षक, पोलीस निरीक्षकासह इतर अधिकाऱ्यांच्या निलंबनाची कारवाई करण्यात आली


उत्तर प्रदेश | हाथरस येथे झालेल्या बलात्कार प्रकरणामुळे देश हादरला होता. तरीही मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ गप्प का?, असा सवाल केला जात होता. अशातच योगी सरकारने या प्रकरणात युपी पोलिसांवर कारवाई केली आहे. यासंदर्भात ANI ने वृत्त दिलं आहे. पोलीस अधीक्षक, उप अधीक्षक, पोलीस निरीक्षकासह इतर अधिकाऱ्यांच्या निलंबनाची कारवाई करण्यात आली आहे. यासंदर्भात उत्तर प्रदेशच्या मुख्यमंत्री कार्यालयाने ही माहिती दिली आहे.
दरम्यान, हाथरस प्रकरणात पोलीस अधीक्षक आणि उप अधीक्षक या दोघांचीही नार्को आणि पॉलिग्राफ चाचणी केली जाणार असल्याचंही सांगण्यात आलं आहे. आता दोषींना काय शिक्षा होते हे पाहणं महत्वाचं ठरणार आहे.