उत्तर प्रदेशच्या मुख्यमंत्रिपदाचा योगींनी राजीनामा द्यावा- मायावती

MAYAVATI-YOGI

लखनऊ – उत्तर प्रदेशातील हाथरस येथे दलित युवतीवर झालेल्या बलात्कार आणि हत्या प्रकरणामुळे देशभर संतापाची लाट उसळली आहे. बहुजन समाज पक्षाच्या नेत्या मायावती या मुद्यावरून राजकारण खेळत आहेत. उत्तरप्रदेशचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांच्या राजीनाम्याची मागणी करण्याचा अधिकार त्यांना नाही, अशी टीका आठवले यांनी केली आहे दरम्यान, हाथरस आणि बलरामपूरमधील महिला अत्याचाराच्या घटनांचा संदर्भ देऊन बसपाच्या प्रमुख मायावती यांनी उत्तर प्रदेशातील कायदा आणि सुव्यवस्था स्थितीवर प्रश्‍नचिन्ह उपस्थित केले आहे. उत्तर प्रदेशच्या मुख्यमंत्रिपदाचा योगींनी आदित्यनाथ यांनी राजीनामा द्यावा. त्यांच्या जागी सक्षम नेत्याला मुख्यमंत्री बनवायला हवे. भाजपच्या केंद्रीय नेतृत्वाला ते जमणार नसेल तर उत्तर प्रदेशातील कायदा आणि सुव्यवस्था स्थिती सुधारण्यासाठी राष्ट्रपती राजवट लागू केली जावी, असे मायावती यांनी म्हटले.

Latest News