योगीजी राजीनामा द्या, पोलीस अधिकाऱ्यांचे निलंबन करून जबाबदारी झटकू नका – प्रियांका गांधी


नवी दिल्ली | जिल्हाधिकारी आणि पोलीस अधीक्षकांचे फोन कॉल रेकॉर्ड सार्वजनिक करा. पोलीस अधिकाऱ्यांचे निलंबन करुन जबाबदारी झटकू नये, योगी आदित्यनाथ यांनी राजीनामा द्यावा, अशी मागणी काँग्रेस नेत्या प्रियांका गांधी यांनी केली आहे. योगी आदित्यनाथ जी काही मोहऱ्यांना निलंबित करुन काय होणार आहे? हाथरसची पीडिता, तिच्या कुटुंबाला भयानक परिस्थितीला कुणाच्या आदेशावरून सामोरे जावे लागले?, असा सवाल प्रियांका गांधी यांनी केला आहे.
मुख्यमंत्रीजी तुम्ही तुमच्या जबाबदारीतून बाजूला होण्याचा प्रयत्न करु नये. देश आपल्याला बघत आहे, तुम्ही राजीनामा द्या, अशी मागणी प्रियांका गांधी यांनी केली.