हॉटेल, रेस्टॉरंटस् आणि बार आजपासून पुन्हा सुरु


मुंबई | कोरोनाच्या पार्श्वभूमीवर राज्यातील हॉटेल, रेस्टॉरंटस् आणि बार बऱ्याच दिवसांपासून बंद होते. काही नियम आणि अटींसह हॉटेल, रेस्टॉरंट आणि बार पुन्हा सुरु करण्यास राज्य सरकारने परवानगी दिली आहे. हॉटेल, रेस्टॉरंटस् आणि बार आजपासून पुन्हा सुरु होणार आहे. 50 टक्के क्षमता, थर्मल स्क्रिनिंग, हँडवॉश किंवा सॅनिटायझरचा वापर यांसह काही नियम सरकारकडून जाहीर करण्यात आले आहे. सरकारकडून आदर्श कार्यप्रणाली जारी केली आहे. कार्यप्रणालीत दिलेल्या सूचनांचे तंतोतंत पालन करण्याचं आवाहन राज्य सरकारकडून करण्यात आल आहे.