हाथरस: जिल्हाधिकाऱ्यांची हकालपट्टी करून चौकशी व्हावी – प्रियंका गांधी

priyanka-yogi_3_1_20266527_15190462

हाथरस | हाथरसमध्ये झालेल्या सामूहिक बलात्कार पीडितेच्या कुटुंबीयांची काल प्रियंका गांधी यांनी भेट घेतली. यानंतर जिल्हाधिकाऱ्यांनी पदावरून करण्यात यावी, अशी मागणी काँग्रेस सरचिटणीस प्रियंका गांधी यांनी केलीये. प्रियंका गांधी म्हणाल्या, मुलीवर झालेल्या सामूहिक बलात्कार आणि तिच्या मृत्यूचं प्रकरण जिल्हाधिकाऱ्यांनी ज्या पद्धतीने हाताळलं, त्याबद्दल त्यांची पदावरून हकालपट्टी करून चौकशी करण्यात यावी. कुटुंबीयांना जिल्हा दंडाधिकाऱ्यांनी वाईट वागणूक दिली. जर उत्तर प्रदेश सरकार झोपेतून जागं झालं असेल तर त्यांनी या पीडितेच्या कुटुंबीयांचं म्हणणं ऐकावं, असंही त्या म्हणाल्या.

Latest News