हाथरस: कुटुंबीयांना ‘वाय’ सुरक्षा द्या, अन्यथा त्यांना माझ्या घरी घेऊन जातो- भीम आर्मी


नवी दिल्ली | राजकीय नेते उत्तर प्रदेशमधील हाथरसमध्ये बलात्कार पीडितेच्या घरी जाऊन कुटुंबियांची भेट घेऊ लागले आहेत. अशातच भीम आर्मीचे प्रमुख चंद्रशेखर आझाद यांनी हाथरसमध्ये जात सरकारकडे मागणी केली आहे. पीडितेच्या कुटुंबीयांना ‘वाय’ सुरक्षा द्या, अन्यथा त्यांना माझ्या घरी घेऊन जातो. ते इथे सुरक्षित नसल्याचं चंद्रशेखर आझाद यांनी म्हटलं आहे. दरम्यान, या घटनेची सर्वोच्च न्यायालयाच्या निवृत्त न्यायधीशांच्या निगराणीखाली चौकशी करण्यात यावी, अशी मागणीही आझाद यांनी केली आहे.