पुण्यातील चिराग फलोर या विद्यार्थ्यांने ‘जेईई अॅडव्हान्स’ मध्ये परीक्षेत देशात प्रथम क्रमांक


पुणे: जेईई ऍडव्हान्स परीक्षेचा निकाल जाहीर झाला असून पुण्यातील चिराग फलोर या विद्यार्थ्यांने परीक्षेत देशात प्रथम क्रमांक पटकावला आहे. चिरागने ३९६ गुणांपैकी ३५२ गुण मिळवत यश संपादन केले आहे. जेईई अॅडव्हान्स परीक्षेसाठी देशभरातून एक लाख ५० हजार ८३८ विद्यार्थ्यांनी परीक्षेसाठी नोंदणी केली होती. त्यातील ४३ हजार २०४ विद्यार्थी परीक्षा उत्तीर्ण झाले आहेत. उत्तीर्ण झालेल्या विद्यार्थ्यांना पैकी ६ हजार ७०७ मुली आहेत. चिराग म्हणाला,मी मूळचा राजस्थान येथील असून इयत्ता अकरावी बारावीचे शिक्षण दिल्लीतून पूर्ण केले आहे.माझे वडील पुण्यात खाजगी कंपनीत प्रोजेक्ट मॅनेजर असून सध्या मी एमआयटीमध्ये बीएससी अभ्यासक्रमासाठी प्रवेश घेतला आहे. मला संशोधन क्षेत्रात कामगिरी करण्याची इच्छा असून ॲस्ट्रोफिजिक्स हे माझे आवडते क्षेत्र आहे.
इंडियन इंस्टिट्यूट ऑफ टेक्नोलॉजी, दिल्ली (IIT) कडून जेईई अॅडव्हान्स 2020 (JEE Advanced 2020) परीक्षेचा निकाल जाहीर करण्यात आला आहे. यंदा एकूण 1.6 लाख विद्यार्थ्यांनी परीक्षेसाठी रजिस्ट्रेशन केलं होतं. त्यापैकी 96 टक्के विद्यार्थ्यांनी ही परीक्षा दिली आहे. विद्यार्थी JEE Advanced च्या अधिकृत वेबसाईटवर जाऊन लॉग इन करून आपला निकाल पाहू शकतात.