आमच्यात संस्कार आहेत म्हणून आम्ही तुमची थोबाड फोडली नाहीत – यशोमती ठाकूर


मुंबई | भाजपचे आमदार सुरेंद्र सिंह यांनी हाथरस प्रकरणावरुन मुलींवर चांगले संस्कार नसल्यानेच बलात्कार होत असल्याचं धक्कादायक वक्तव्य केलं होतं. यावरून महिला आणि बालकल्याण मंत्री यशोमती ठाकूर यांनी सुरेंद्र सिंह यांच्यावर टीका केलीये आमच्यात संस्कार आहेत म्हणून आम्ही तुमची थोबाड फोडली नाहीत. आम्हा महिलांनी कसं राहायचं हे अजिबात शिकवू नये, असं यशोमती ठाकूर यांनी म्हटलंय. दरम्यान, भाजपने आधी आपल्या लोकांना संस्कार शिकवावे, अशी टीका देखील यशोमती ठाकूर यांनी भाजपवर केली आहे.