कोविड लसीचे डोस जुलै 2021 पर्यंत मिळवणार

harshvardhan-bjp

नवी दिल्ली | देशातील 20-25 कोटी लोकांंना देण्यासाठी जुलै 2021 पर्यंत आम्ही कोविड लसीचे 400-500 दशलक्ष डोस मिळवणार आहोत, असं केंद्रीय आरोग्यमंत्री डॉ. हर्षवर्धन यांनी सांगितलंय. लस सर्वप्रथम आरोग्य क्षेत्रातील कर्मचाऱ्यांना देण्यास प्राधान्य असेल, असं हर्षवर्धन यांनी म्हटलं आहे. लसीचं नाव, ती कुठून मिळणार, हे मात्र हर्षवर्धन यांनी सांगितलं नाही. दरम्यान, भारताच्या लोकसंख्येला ही लस देण्यासाठी 80 हजार कोटी रुपये लागतील, असं सिरम इन्स्टिट्यूट आॅफ इंडियाचे अदर पुनावाला यांनी म्हटलंय.

Latest News