हाथरस सामूहिक बलात्कार आणि हत्या प्रकरणी धक्कदायक माहिती समोर


लखनऊ | हाथरस सामूहिक बलात्कार आणि हत्या प्रकरणी धक्कदायक माहिती समोर आली आहे. पीडित तरुणीचे 2 वेगवेगळे मेडिकल रिपोर्ट समोर आले आहेत. ‘टीव्ही 9 मराठी’ने या संदर्भातील वृत्त दिलंय.
अलिगड मुस्लिम युनिव्हर्सिटी जवाहरलाल नेहरू मेडिकल कॉलेजने त्यांच्या अंतिम अहवालात फॉरेन्सिक विश्लेषणाचा हवाला देत पीडितेवर लैंगिक अत्याचार झाले नसल्याचं म्हटलं आहे. 22 सप्टेंबरच्या मेडिको लीगल प्रकरणात MLC च्या अहवालात, बलात्काराचे कोणतेही पुरावे सापडले नसल्याच्या यूपी पोलिसांच्या दाव्यांचा विरोध केला आहे.
JNMC च्या फॉरेन्सिक मेडिसिन डिपार्टमेंटने दिलेल्या माहितीनुसार हल्ला झाला त्यावेळी पीडित तरुणी शुद्धीत नव्हती असा उल्लेख करण्यात आला आहे.
एमएलसीच्या अहवालानुसार पीडितेचं तोंड दाबण्यात आलं होतं आणि तिला जिवे मारण्याची धमकी देण्यात आली होती. यावेळी तिच्यावर हल्लाही करण्यात आला होता. पीडितेच्या गळ्यावर जखमा होत्या, पण तिच्या योनीमार्गात कुठलीही जखम न झाल्याचं सांगण्यात आलं आहे.