काँग्रेसचे डी.के. शिवकुमार यांच्या मालमत्तेवर सीबीआयने छापेमारी


कर्नाटक | काँग्रेसचे कर्नाटक प्रदेशाध्यक्ष डी.के. शिवकुमार यांच्या मालमत्तेवर सीबीआयने छापेमारी केलीये. शिवकुमार यांच्यावरील एका भ्रष्टाचार प्रकरणात सीबीआयकडून ही कारवाई करण्यात आलीये. डी.के. शिवकुमार यांच्याविरुद्ध सीबीआयने भ्रष्टाचाराचा गुन्हा दाखल केलेला आहे. याप्रकरणी सीबीआयने कर्नाटकातील 9, दिल्लीतील 4 आणि मुंबईतील 1 अशा 15 ठिकाणांवर आज धाडी टाकल्या. दरम्यान शिवकुमार यांचे भाऊ आणि बंगळुरू ग्रामीणचे खासदार डी.के. सुरेश यांच्या घरांचीही सीबीआयकडून कारवाई करण्यात आलीये. सकाळी 6 वाजता छापेमारी करण्यास सुरुवात करण्यात आली.