मोदी सरकारचं शेतकऱ्यांना आणि कामगारांना उद्ध्वस्त करणं हेच धोरण

नवी दिल्ली | शेतकऱ्यांना आणि कामगारांना उद्ध्वस्त करणं हेच मोदी सरकारचं धोरण, अशी जहरी टीका काँग्रेस नेते राहुल गांधी यांनी मोदी सरकारवर केली आहे. कृषी कायदे हे शेतकरी आणि कामगारांना उद्ध्वस्त करणारे कायदे आहेत. तर जीएसटी आणि नोटाबंदीमुळे लघू आणि मध्यम व्यापाऱ्यांचं आर्थिकदृष्ट्या कंबरडं मोडलं असल्याचं राहुल गांधी यांनी म्हटलं आहे. पीटीआयने यासंदर्भात वृत्त दिलं आहे. दरम्यान, काँग्रेस सत्तेत आल्यास तिन्ही काळे कायदे रद्द करुन कचऱ्याच्या डब्यात फेकून देऊ, असं राहुल गांधी म्हणाले होते.