हाथरस बलात्कार प्रकरणात योगी सरकाची भूमिका संशयास्पद:थोरात

yogi-adityanath-1

मुंबई | हाथरस बलात्कार प्रकरणात योगी आदित्यनाथ सरकाची भूमिका संशयास्पद असून, उत्तर प्रदेश सरकार पहिल्यापासूनच काहीतरी लपवण्याचा प्रयत्न करत असल्याचा आरोप काँग्रेस प्रदेशाध्यक्ष आणि महसूलमंत्री बाळासाहेब थोरात यांनी केला आहे. सोमवारी मुंबईत मंत्रालयाजवळील महात्मा गांधी पुतळ्यासमोर थोरात यांच्या नेतृत्वाखाली पिडीत कुटुंबाला न्याय मिळवून देण्यासाठी काँग्रेसतर्फे राज्यव्यापी सत्याग्रह करण्यात आला. त्यावेळी ते बोलत होते.

उत्तर प्रदेशातील घटना अमानवी असून योगी आदित्यनाथ आणि उत्तर प्रदेश पोलिसांनी केलेल्या कृत्यांचा निषेध म्हणून हा सत्याग्रह कत असल्याचे थोरात यांनी सांगितले.

Latest News