पुन्हा हाथरसमधील 19 वर्षीय मुलीवर सामूहिक बलात्कार


मुंबई | हाथरसमधील 19 वर्षीय मुलीवर सामूहिक बलात्कार झाल्याची घटना ताजी असताना त्याच जिल्ह्यामध्ये एका सहा वर्षीय बलात्कार पीडित मुलीचा मृत्यू झाल्याची बातमी समोर आली आहे. या संदर्भात पीटीआयने वृत्त दिलंय. या मुलीवर तिच्याच नात्यातील व्यक्तीने 10 दिवसांपूर्वी बलात्कार केला होता. ही मुलगी दिल्लीतील रुग्णालयामध्ये उपचार घेत होती. मात्र आज दुपारच्या सुमारात तिची झुंज अपयशी ठरली आणि तिचा मृत्यू झाला. या प्रकरणामध्ये पोलिसांनी 21 सप्टेंबर रोजी एफआयआर दाखल केली आहे. मुलीच्या वडिलांनी पोलिसांकडे तक्रार दाखल केली आहे.