पिंपरी चिंचवड पत्रकार संघाच्या सदस्यांना ओळखपत्र वाटप.

IMG-20201007-WA0245

पिंपरी चिंचवड पत्रकार संघाच्या सदस्यांना ओळखपत्र वाटप.
—- –
पिंपरी -पिंपरी चिंचवड पत्रकार संघाची महत्वपूर्ण बैठक नुकतीच संपन्न झाली. यावेळी मराठी पत्रकार परिषदेचे कार्याध्यक्ष शरद पाबळे,परिषदेचे जिल्हा विभागीय सचिव बापूसाहेब गोरे,पूणे जिल्हा पत्रकार संघाचे अध्यक्ष सूनिल लोणकर यांच्या हस्ते पिंपरी चिंचवड पत्रकार संघाच्या सदस्यांना ओळखपत्र तसेच कोरोनाच्या पार्श्वभूमी वर आरोग्य संरक्षणासाठी शानीटायझर,मास्क चे वाटप करण्यात आले.
या प्रसंगी हवेली तालूका पत्रकार संघाचे अध्यक्ष सूनिल नाना जगताप. समन्वयक एम जी शेलार. आदिंसह जिल्हा पत्रकार संघाचे सर्व पदाधिकारी व तर पिंपरी चिंचवड पत्रकार संघाचे अध्यक्ष आनिल वडघुले. उपाध्यक्ष प्रविण शिर्के जिल्हा प्रतिनिधी दादाराव आढाव मारूती बाणेवार. अनिल भालेराव. दिनेश दूधाळे. बाबू कांबळे. संजय बोरा. विनय लोंढे. विक्रम पवार.माधुरी कोराड सूरज साळवे .आजय कुलकर्णी आदिंसह सर्व सदस्य उपस्थित होते. या प्रसंगी कोरोना मूळे मृत्यू झालेल्या 33 पत्रकारांना बैठकीत सार्वजनीक श्रद्धांजली वाहण्यात आली.
या प्रसंगी कार्याध्यक्ष शरद पाबळे. विभागीय सचिव बापूसाहेब गोरे,जिल्हा अध्यक्ष सूनिल लोणकर यांनी पत्रकारांना विशेष मार्गदर्शन केले.यावेळी उपस्थित मान्यवरांचा पिंपरी चिंचवड पत्रकार संघाच्यावतीने सन्मान करण्यातआला.उपस्थितांचे स्वागत प्रविण शिर्के यांनी तर प्रास्ताविक अध्यक्ष अनिल वडघुले यांनि केले.बैठकी नंतर प्रिती भोजनाचा आस्वाद घेऊन कार्यक्रमाची सांगता करण्यात आली.

Latest News