सीबीआयचे माजी संचालक अश्विनीकुमार यांचा रहस्य उलगडण्यात कोणाला रस नाही-शिवसेना


मुंबई | सीबीआयचे माजी संचालक अश्विनीकुमार यांचा मृतदेह लटकलेल्या अवस्थेत मिळाला. त्यांचा मृत्यू का झाला हे रहस्य शोधण्यात कोणालाच रस नसल्याचा आरोप शिवसेनेने केला आहे. शिवसेनेने सामनाच्या अग्रलेखातून यावर प्रश्नचिन्ह उपस्थित केलंय. अश्विनीकुमार मनाने, शरीराने खंबीर होते. त्यांच्यावर सरकारने अनेक जबाबदाऱ्या सोपवल्या होत्या. मात्र ही व्यक्ती आत्महत्या करते आणि त्यावर कोणी प्रश्नचिन्ह निर्माण करत नाही याचं आश्चर्य वाटतंय.
अश्विनीकुमार यांना खरंच आयुष्याचा कंटाळा आला होता, की त्यांच्यावर कुणाचा दबाव होता. यावर सध्या हिमाचलात वास्तव्यास असलेल्या नटीने भाष्य केलं पाहिजे, असा टोलाही अग्रलेखातून लगावण्यात आलाय.