माध्यमांच्या स्वातंत्र्यावर हल्ला करणं हे जनता कधीही सहन करणार नाही – प्रकाश जावडेकर

prakash-jawdekar-bjp

नवी दिल्ली | गुरुवारी मुंबई पोलिसांनी एक मोठा टीआरपी घोटाळा उघडकीस आणला. यामध्ये जाहिराती मिळवण्यासाठी काही वाहिन्यांचा समावेश असल्याचं समोर आलं. या टीआरपी प्रकरणावरून केंद्रीय मंत्री प्रकाश जावडेकर यांनी राज्य सरकारवर टीका केली आहे. जावडेकर त्यांच्या ट्विटमध्ये म्हणतात, माध्यमांच्या स्वातंत्र्यावर हल्ला करणं हे जनता कधीही सहन करणार नाही. काँग्रेस आणि काही सहकारी पक्ष प्रसारमाध्यमांच्या स्वातंत्र्यावर गदा आणत आहेत. हे लोकशाहीच्या मूल्यांविरोधात असून स्विकारार्ह नाही, असंही ते म्हणालेत.

Latest News