बिहार: निवडणूक प्रचारात हात मिळवणं आणि गळाभेटीवर बंदी

बिहार | कोरोनाच्या पार्श्वभूमीवर बिहार विधानसभा निवडणुकीदरम्यान योग्य ती काळजी घेण्यात येणार आहे. यामध्ये प्रचारादरम्यान बिहार सरकारकडून काही मार्गदर्शक तत्त्वं जारी करण्यात आलीयेत. या मार्गदर्शत तत्त्वांनुसार, बंद सभागृहात किंवा खुल्या मैदानात होणाऱ्या सभेत 200 हून अधिक लोकांना सहभागी होण्याची परवानगी नाहीये. त्याचप्रमाणे, प्रचारासाठीच्या रॅलीत सहभागी होणाऱ्या लोकांना सहा फुटांचं अंतर ठेवावं लागणार आहे. प्रत्येकाच्या तोंडावर मास्क बंधनकार असेल. तसंच कोणताही नेता दुसऱ्या नेत्यासोबत हात मिळवू शकत नाही किंवा गळाभेट घेऊ शकत नाही.

Latest News