105 आमदारांना बेकार करून सरकार स्थापन करणारे तुमचे बाप कोण आहेत हे संपूर्ण महाराष्ट्राला माहीत आहे

मुंबई | सत्तेची स्वप्न पाहू नका, आम्हीही तुमचे बाप आहोत, अशा शब्दात भाजप प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटलांनी उपमुख्यमंत्री अजित पवारांवर टीका केली. याला राष्ट्रवादीचे आमदार अमोल मिटकरी यांनी उत्तर देत चंद्रकांत पाटील यांच्यावर निशाणा साधलाय. काय तर म्हणे, आम्ही तुमचे बाप आहोत. निवडणूक निकाल जाहीर झाल्यावर 105 आमदारांना बेकार करून मविआ सरकार स्थापन करणारे तुमचे बाप कोण आहेत हे संपूर्ण महाराष्ट्राला माहीत आहे, अशी बोचरी टीका अमोल मिटकरी यांनी चंद्रकांत पाटलांवर केलीये. 2022 ला पुणे मनपात पुण्याची जनता अजितदादा पवार हेच तुमचे बाप आहोत हे सिद्ध करून दाखवेल, असा टोलाही मिटकरींनी चंद्रकांत पाटलांना लगावला आहे.

Latest News