आरेतील कारशेड आता कांजूरमार्गमध्ये करण्यात येणार- मुख्यमंत्री उद्धव ठाकरे

मुंबई | कोरोनाच्या पार्श्वभूमीवर मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी आज राज्यातील जनतेशी संवाद साधला. यावेळी मुख्यमंत्र्यांनी आरेतील जंगल व कारशेड संदर्भात मोठी घोषणा केलीय मुख्यमंत्री म्हणाले, मुंबईसाठी मोठा निर्णय सांगून मी लाईव्हची सुरूवात करणार आहे. आरे कारशेडला माझा विरोध होता. त्यानुसार आरेतील कारशेड दुसरीकडे स्थलांतरित करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे.

आरेतील कारशेड आता कांजूरमार्गमध्ये करण्यात येणार आहे. कांजूरमार्गमध्ये ज्या ठिकाणी कारशेड उभारण्यात येणार आहे, ती जमीन सरकारची आहे. या कामासाठी मी उपमुख्यमंत्री अजित पवार आणि पर्यावरणमंत्री आदित्य ठाकरे यांच्यासोबत मेट्रो कर्मचाऱ्यांचेही आभार मानतो, असंही मुख्यमंत्री म्हणाले.

Latest News