मुंबईत वीज गायब झाली. ही नियोजन शून्यता असून या सरकारचं सर्किट ठिकाण्यावर आहे का?


मुंबई | मुंबईत वीज गायब झाली. ही नियोजन शून्यता असून या सरकारचं सर्किट ठिकाण्यावर आहे का?. या नियोजन शून्यतेला जबाबदार असलेल्या अधिकाऱ्याला निलंबित करा, अशी मागणी भाजप आमदार आशिष शेलार यांनी केली आहे. सरकारचं डोकं ठिकाण्यावर आहे का? कुठे आहे वीज मंत्री? मुख्यमंत्री आता जनतेशी का बोलत नाहीत?, असं म्हणत आशिष शेलार यांनी सरकारवर टीका केली आहे. चाकरमानी लोकलमध्ये अडकले आहेत. हा केवळ नियोजन शून्यतेचा परिणाम आहे. या नियोजन शून्यतेला जबाबदार असलेल्या तात्काळ निलंबित करा, अशी मागणी आशिष शेलार यांनी केली आहे.