संताच्या राज्यात संतांच्याच आता हत्या होऊ लागल्या

लखनोै – उत्तर प्रदेशात गोंडा जिल्ह्यातील एका मंदिराच्या पुजाऱ्याची हत्या करण्याचा प्रकार नुकताच घडला आहे. त्यावरून बहुजन समाज पक्षाच्या नेत्या मायावती यांनी योगी सरकारवर ट्विटरवरून जोरदार टीका केली आहे. त्यांनी म्हटले आहे की संताच्या राज्यात संतांच्याच आता हत्या होऊ लागल्या आहेत, ही बाब योगी सरकारला भूषणावह नाही.
लॅंडमाफियांकडून ही हत्या झाली आहे. मंदिराची जमीन बळकावण्यासाठी अशा हत्या होत असतील तर ती अत्यंत भीषण बाब असून योगी सरकारने अशा घटनांकडे गांभीर्याने लक्ष देण्याची गरज त्यांनी व्यक्त केली आहे.
योगी स्वतः संत आहेत आणि संताच्यात राज्यात संतांच्या हत्या होत असतील तर बिघडलेल्या कायदा आणि सुव्यवस्था स्थितीचे आणखी वेगळे लक्षण काय असू शकते, असा सवाल त्यांनी केला आहे. या घटनेशी संबंधित सर्व लॅंडमाफियांना अटक करून त्यांच्या जमिनी सरकारने जप्त कराव्यात, अशी मागणीही मायावती यांनी केली आहे.