बीड जिल्ह्यातील विकासकामांसाठी आलेला कोट्यवधी रुपयांचा निधी बारामतीला कसा काय वर्ग होतो?,


बीड | राज्य सरकारकडे निधीच नाही तर मग बीड जिल्ह्यातील विकासकामांसाठी आलेला कोट्यवधी रुपयांचा निधी बारामतीला कसा काय वर्ग होतो?, असा सवाल बीडच्या खासदार प्रीतम मुंडे यांनी उपस्थित केलाय. महिलांवरील वाढत्या अत्याचारांविरोधात आज बीडमध्ये भारतीय जनता पक्षाच्या वतीने आक्रोश आंदोलन करण्यात आलं. यावेळी प्रीतम मुंडे बोलत होत्या.
अतिवृष्टीमुळे राज्यातील अनेक ठिकाणी शेतकऱ्यांचे प्रचंड नुकसान झालं आहे, त्यांच्या मदतीसाठीदेखील राज्य सरकारकडे पैसे नाहीत. एवढंच नाही तर कोरोना महामारीशी लढण्यासाठीदेखील सरकारकडे निधी नाही. केंद्राने दिलेल्या निधीवरच लोकांवर उपचार केले जात आहेत, असं प्रीतम मुंडे यांनी म्हटलंय.