डेटींगसाठी मुली,जेष्ठ नागरिकांची चार लाखाची फसवणूक

old-man-3

पुण्यात एका ज्‍येष्‍ठ नागरिकास डेटींगसाठी मुली पुरवतो म्‍हणून सांगत तब्‍बल पावणे चार लाख रूपयांचा गंडा घालण्यात आला आहे. या प्रकरणी सायबर पोलिस ठाण्यात अज्ञात मोबाईल धारक व्यक्‍तीच्या विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

पुण्यातील क्‍वार्टर गेट परिसरात राहणार्‍या एका ६८ वर्षीय जेष्‍ठ नागरिकास एका अज्ञात व्यक्‍तीने संपर्क साधुन तुम्‍हाला डेटींगसाठी मुली पुरवितो, असे सांगितले. यासाठी अज्ञात व्यक्‍तीने मोबाईल वरून एका खात्‍यावर पैसे भरायला सांगितले. या जेष्‍ठ नागरिकानेही आरोपी मोबाईलधारक सांगेल त्‍या बँक खात्‍यामध्ये पैशांचा भरणा केला. यानंतर वेळोवेळी वेगवेगळी कारणे देत मोबाईल धारकाने आणखी पैसे भरण्यात सांगितले. अशा प्रकारे संबंधीत आरोपीने जेष्‍ठ नागरिकाकडून तब्‍बल तीन लाख ७४ हजार रूपये भरायला लावले, आणि मुली न पुरवता जेष्‍ठ नागरिकाची फसवणूक केली.

आपली फसवणूक झाल्‍याचे लक्षात आल्‍यानंतर जेष्‍ठ व्यक्‍तीने पोलिस ठाण्यात धाव घेतली. संबधीत आरोपी विरूध्द सायबर पोलिस ठाण्यात तक्रार दाखल केली. पोलिसांनी या घटनेवरून अज्ञात व्यक्‍तीविरोधात गुन्हा दाखल केला असून, अधिक तपास सुरू केला आहे.

Latest News