माहिती अधिकारं कार्यकर्त रविंद्र बऱ्हाटे सह 13 जणांविरुद्ध मोक्का


पुणे | पुणे पोलिसांनी माहिती अधिकार कार्यकर्ता आणि त्याच्या टोळीविरुद्ध ‘मोक्का’ लागू केलाय. माहिती अधिकाराचा गैरवापर करून संघटितरित्या बंगला बळकावणारा रविंद्र बऱ्हाटे आणि त्याच्या 13 ही कारवाई करण्यात आलीये
हॉटेल व्यावसायिकाला धमकावून त्याचा बंगला बळकावण्याचा प्रयत्न केल्याप्रकरणी रवींद्र बऱ्हाटे आणि त्याच्या साथीदारांविरुद्ध हडपसर पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल झाला होता. गुन्हे शाखेच्या पोलिसांकडून या गुन्ह्याचा तपास सुरू होता.
या तपासणीनंतर रवींद्र बऱ्हाटेने संघटीत गुन्हेगारी टोळी तयार केली असल्याचं लक्षात आलं. शिवाय त्याच्या साथीदारांनी शहरात इतर ठिकाणी गुन्हे केल्याचं पोलिसांच्या निदर्शनास आलं होतं. त्यानुसार संबंधित आरोपींविरुद्ध मोक्का लावण्यात आलाय.