मी कुणाचाही बाप काढला नाही – चंद्रकांत पाटील

कोल्हापूर | बापाची पेंड हा सहजपणे वापरला जाणारा शब्द आहे. त्या शब्दाचा मी वापर केला. त्यातून कुणाचाही बाप काढायचा नव्हता. मी कुणाचाही बाप काढला नाही, असं भाजपचे प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांनी म्हटलंय. आपल्या मराठीत अनेक शब्द सहजपणे वापरले जातात. तुमच्या बापाची पेंड आहे का? असं आपण सहज पणे म्हणतो. पुणे प्रभाग समितीच्या निवडणुकीच्या संदर्भानं आम्हीही बाप आहोत, असं मी म्हणालो, असं चंद्रकांत पाटील म्हणालेत.

कुणाचाही बाप काढायचा नव्हता. तसा माझा हेतूही नव्हता. अजित पवारांचाही बाप काढलेला नाही. हा सहज वापरलेला शब्द आहे. हे यांना कळत नाही का? त्यावरून अंगावर येण्याची गरजच काय?, असा सवाल चंद्रकांत पाटील यांनी केला.

Latest News