दोन ‘राजे’ खासदार असलेल्या पक्षाचा मी अध्यक्ष आहे -चंद्रकांत पाटील

पुणे : मराठा आरणक्षाच्या प्रश्नावर राज्य सरकार गंभीर नाही. सरकारने प्रामाणिक प्रयत्न केले तर त्यातून मार्ग काढता येतो असं मत भाजपचे प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांनी व्यक्त केलंय. मराठा विद्यार्थ्यांना शिक्षणात मदत करणे आणि असे अनेक निर्णय घेता येऊ शकतात असंही ते म्हणाले. या पर्यायांवर खासदार उदयनराजे भोसले आणि संभाजीराजे का बोलत नाही असा प्रश्न विचारल्यावर पाटील म्हणाले, दोन ‘राजे’ खासदार असलेल्या पक्षाचा मी अध्यक्ष आहे. मी जे बोलतो तेच मत सगळ्या आमदार आणि खासदारांचं असतं असा सूचक इशाराही त्यांनी सरकारला दिला.

कोथरूड मतदारसंघातल्या प्रश्नांबाबात चंद्रकांत पाटील यांनी आज पुण्यात बैठक आयोजित केली होती. त्यानंतर पत्रकारांशी ते बोलत होते. ओबीसींच्या आरक्षणाला धक्का न लावता काय करता येईल या पर्यायांचा विचार भाजप सरकारने केला होता. तो होताना आता दिसत नाही असंही ते म्हणाले.

एकनाथ खडसे हा विषय आमच्यासाठी आता संपला आहे असं म्हणत त्यांनी खडसेंच्या कुठल्याही प्रश्नाला उत्तर देणं टाळलं

राज्यपाल नियुक्त आमदारांची नाव आता जवळपास निश्चित झाली आहे. लवकरच 12 जणांची यादी ही राज्यपालांकडे सोपण्यात येणार आहे. परंतु, ‘देवेंद्र फडणवीस आणि राज्यपाल यांनी विधान परिषदेची 12 आमदारांची नावं बाजूला काढण्याचे ठरवले आहे’, असा गंभीर आरोप ग्रामविकास मंत्री हसन मुश्रीफf) यांनी केला होता.

कोल्हापूरमध्ये झालेल्या पत्रकार परिषदेत ग्रामविकास मंत्री हसन मुश्रीफ यांनी भाजपचे प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांच्या वक्तव्याचा दाखल देत भाजपचे विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांच्यावर गंभीर आरोप केला होता. त्यावर बोलताना पाटील यांनी कुठलंही उत्तर दिलं नाही. राज्यपाल पदाची गरीमा सगळ्यांनीच ठेवली पाहिजे असं मतही त्यांनी व्यक्त केलं.

दरम्यान, राज्यपाल नियुक्त आमदारांची यादीत कुणाचे नाव वर्णी लागावे यासाठी गेल्या काही दिवसांपासून शिवसेना, काँग्रेस आणि राष्ट्रवादीमध्ये जोरदार बैठका सुरू होत्या. अखेर तीन दिवसांपूर्वी मंत्रिमंडळाच्या बैठकीत नावांना मान्यता देण्यात आली. यात 12 नावे असून शिवसेना, काँग्रेस आणि राष्ट्रवादीने मिळून ही यादी तयार केली आहे. यात अनेक नवीन चेहरे असण्याचीही शक्यता व्यक्त केली जात आहे. पण, यात काही जणांना डच्चू देण्यात आला आहे.

Latest News