औरंगाबाद: शिवसेना आणि काँग्रेसचे नेते आमनेसामने, तुमचा आदर्श आहे का?


प्रतिनिधी: परिवर्तनाचा सामना: औरंगाबादचं नाव संभाजीनगर करण्याच्या मुद्द्यावरुन आता सत्ताधारी महाविकास आघाडीतील शिवसेना आणि काँग्रेसचे नेते आमनेसामने खासदार अरविंद सावंत यांनी औरंगजेब तुमचा आदर्श आहे काय असा सवाल काँग्रेस नेत्यांना केला आहे. ते मुंबईमध्ये माध्यमांशी बोलत होते. औरंगाबादचं नाव संभाजीनगर करण्याच्या मागणीसाठी शिवसेना पुन्हा एकदा आक्रमक झाली आहे. त्याला काँग्रेसकडून मोठा विरोध होताना पाहायला मिळतोय. यावर शिवसेनेचे खासदार अरविंद सावंत यांनी प्रतिक्रिया दिली आहे. शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांनी 1988 मध्ये औरंगाबादचं नाव संभाजीनगर असं घोषित केलं आहे. तेव्हापासून हा लढा सुरु आहे. शासनाकडून यापूर्वीच मान्यता मिळायला हवी होती. पण दुर्दैवानं तसं झालं नाही. पण आता उद्धव ठाकरे मुख्यमंत्री असल्यामुळे पुन्हा एकदा ही मागणी जोर धरत आहे. कोरोनामुळे राहिलं होतं पण आता हे काम होई, असा दावा अरविंद सावंत यांनी केला आहे. दरम्यान, औरंगाबादचं नाव संभाजीनगर करण्याच्या मुद्द्यावरुन आता सत्ताधारी महाविकास आघाडीतील शिवसेना आणि काँग्रेसचे नेते आमनेसामने