सोनिया गांधी आणि मायावतीजी यांना भारतरत्न देऊन सन्मानित करा – हरिश रावत

Backup_of_ps-final-edit-5

प्रतिनिधी: परिवर्तनाचा सामना: हरिश रावत यांना आपल्या ट्विटर आकाऊंटवरुन ट्विट केलं आहे. हरिश रावत यांनी ही पोस्ट भारत सरकार आणि पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनाही टॅग केली आहे. काँग्रेसच्या हंगामी अध्यक्षा सोनिया गांधी आणि उत्तर प्रदेशच्या माजी मुख्यमंत्री मायावती या दोघीही हुशार आणि प्रखर महिला राजकारणी असून त्यांच्या राजकारणाशी तुम्ही सहमत असाल किंवा नसाल, पण भारतीय महिलांचा सन्मान आणि सामाजिक समर्पण तसेच लोकसेवेच्या मापदंडांना सोनिया गांधी यांनी एक नवी उंची प्राप्त करुन दिल्याचं कोणीही नाकारु शकत नाही. संयुक्त पुरोगामी आघाडीच्या अध्यक्षा सोनिया गांधी आणि बहुजन समाज पार्टीच्या सुप्रीमो मायावती यांना भारतरत्न देऊन सन्मानित करायला हवं, आहे. त्यांना आज भारतीय महिलांचे गौरवशाली स्वरुप मानलं जातं. त्याचबरोबर अनेक वर्षांपासून पीडित-शोषित लोकांच्या मनात मायावती यांनी एक अद्भुत विश्वास जागृत केला असल्यामुळं भारत सरकारनं या दोन्ही व्यक्तिमत्वांचा भारतरत्न देऊन सन्मान करावाअसं मत उत्तराखंडचे माजी मुख्यमंत्री आणि काँग्रेस नेते हरिश रावत यांनी व्यक्त केलं

Latest News