अपघातांचे प्रमाण कमी होण्यासाठी विभागाच्या अधिकाऱ्यांना सुचना…

Pune-Collector-Dr-Rajesh-Deshmukh-1

प्रतिनिधी: परिवर्तनाचा सामना: जिल्हाधिकारी डॉ. राजेश देशमुख यांनी दिल्या. जिल्हास्तरीय रस्ता सुरक्षा समितीची बैठक जिल्हाधिकारी डॉ. राजेश देशमुख यांच्या अध्यक्षतेखाली झाली. या वेळी त्यांनी या सुचना दिल्या.या बैठकीला प्रादेशिक परिवहन अधिकारी डॉ. अजित शिंदे, महामार्ग विभागाचे पोलीस अधीक्षक संजय जाधव, पुणे ग्रामीणचे अतिरिक्त पोलीस अधीक्षक मिलिंद मोहिते, जिल्हा शल्यचिकित्सक डॉ. अशोक नांदापूरकर, कॉलेज ऑफ इंजिनिअरिंगचे डॉ. बी. बी. आहुजा, शहर वाहतूक शाखेचे पोलीस उपायुक्त राहूल श्रीरामे, तसेच समिती सदस्य उपस्थित होते.जिल्हाधिकारी डॉ. देशमुख म्हणाले, दरवर्षी ‘रस्ता सुरक्षा सप्ताह’ साजरा केला जातो. यावर्षी ‘रस्ता सुरक्षा महिना’ साजरा करण्याचे निर्देश केंद्र सरकारने दिले आहेत. हे अभियान 18 जानेवारी ते 17 फेब्रुवारी 2021 दरम्यान राबविण्यात येणार आहे. कोरोनाच्या पार्श्वभूमीवर आवश्यक ती खबरदारी घेऊन या अभियानाच्या यशस्वी अंमलबजावणीसाठी संबंधित विभाग, संस्था, संघटनांनी जनजागृतीपर विविध कार्यक्रमांचे आयोजन करावे. कोरोनाच्या पार्श्वभूमीवर प्रसारमाध्यमे व सोशल मीडियाच्या माध्यमातून रस्ता सुरक्षा विषयी जनजागृती करावी. तसेच घेण्यात येणारे उपक्रम वर्षभर सुरु ठेवावेत, असे देशमुख यांनी सांगितले. तसेच स्व. बाळासाहेब ठाकरे रस्ते अपघात विमा योजनेची माहिती सर्व नागरिकांपर्यंत पोहोचवावी. वैद्यकीय व्यावसायिकांनी या योजनेअंतर्गत रस्ते अपघातातील व्यक्तींना त्वरित वैद्यकीय उपचार मिळवून द्यावेत सुचना दिल्या.

Latest News