पिंपरी: नूतनीकरण झालेले नाही. तरीही त्या जागांचा वापर सुरूच- माजी खासदार गजानन बाबर


पिंपरी : माजी खासदार गजानन बाबर यांनी माहिती अधिकारात याबाबतची माहिती मागितली होती. पालिकेने दिलेल्या लेखी उत्तरात याबाबतची सविस्तर माहिती बाबर यांना देण्यात आली आहे. त्यानुसार, महापालिकेने स्वत:च्या मालकीच्या अनेक मिळकती भाडेदराने दिल्या आहेत. व्यापारी गाळे, लीजद्वारे, भाडेदराने दिलेले गाळे तसेच भाजी मंडईचे गाळे असे त्याचे वर्गीकरण आहे. याव्यतिरिक्त, शासकीय कार्यालयांसाठी ६९ इमारती दिल्या असून पीएमपीसाठी ६ आणि मेट्रोसाठी १० जागा देण्यात आल्या आहेत. यापैकी १४५ व्यापारी गाळे आणि १२२४ भाजी मंडईचे गाळे मिळून १३६९ मिळकतींचा करार संपलेला आहे. त्याचे नूतनीकरण झालेले नाही. तरीही त्या जागांचा वापर सुरूच आहे. परिणामी, पालिकेचे दोन वर्षांत तीन कोटींचे उत्पन्न बुडाल्याची बाब बाबर यांनी निदर्शनास आणून दिली आहे. दोषी अधिकाऱ्यांवर कठोर कारवाईची मागणी त्यांनी आयुक्त श्रावण हर्डीकर यांच्याकडे केली आहे.