FDR प्रकरणात आयुक्त हार्डीकर यांच्यावर गुन्हा दाखल करा :भ्रष्टाचार निर्मुलन समिती

पिंपरी प्रतिनिधी: परिवर्तनाचा सामना: शहर विकास कामाचे कंत्राटासाठी डिपॉझिट रिसीट (FDR) आणि बँक हमी देणे बंधनकारक असतं. पण महापालिकेतील अधिकारी वर्ग आणि ठेकेदार यांच्या संगनमतीने ही कंत्राट बोगस एफडीआरच्या माध्यमातून देण्यात आले. त्यामुळे जनतेची फसवणूक केली असल्याचा आरोप भ्रष्टाचार निर्मुलन समितीने केला आहे.

बँक खात्यावर लाच घेतल्याचे डॉ अनिल रॉय यांच्यावर सिद्ध होऊनही आयुक्त खुद्द कानाडोळा करत आहेत, असा आरोप खुडे यांनी या पत्राद्वारे केला आहे.

पिंपरी चिंचवड महापालिकेतील बोगस एफडीआर प्रकरणातील 18 ठेकेदारांवर फौजदारी गुन्हा दाखल करण्याची मागणी भ्रष्टाचार निर्मुलन समितीचे शांताराम खुडे यांनी केली आहे. तसेच वैद्यकीय अधिकारी अनिल रॉय यांच्याही चौकशीची मागणी करण्यात आली आहे. याबाबतचे पत्र महापालिका आयुक्त श्रावण हर्डीकर यांना देण्यात आले आहे. येत्या आठ दिवसात हे दोन्ही प्रकरण निकाली काढून ठेकेदारांवर फौजदारी गुन्हा दाखल करावे, तसेच रॉय यांची चौकशी करावी अन्यथा भ्रष्टाचार निर्मुलन समितीकडून आयुक्तांवरच सहगुन्हेगार ग्राह्य धरून गुन्हा दाखल केला जाईल, असा इशारा देण्यात आला आहे.

Latest News